तुळजापूर , दि .०६

  शहरातील आराधवाडी परिसरातील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार (दि. ०६) रोजी पहाटे उघडकीस आली. गेल्या दोन दिवसात दुसरी आत्महत्याची शहरात खळबळ माजली आहे. 

     अतुल अमृत काळे वय २९  याने रविवारी रात्री उशिरा  घरातील अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परीवार आहे. त्याचा पार्थिवावर सोमवारी दुपारी ३ वाजणाच्या सुमारास आराधवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    दोन दिवसा पूर्वी हाॅटेल व्यावसायिक दत्ता काळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दोन दिवसात दुसरी आत्महत्या असल्याने  खळबळ माजली आहे. 

 
Top