काटी , दि .०६ :  

मातंग समाजावर होत असलेले सततचे अन्याय अत्याचार तसेच शासनाकडून मातंग समाजाचे आरक्षणाचे असलेले लाभ बंद करण्याचा घाट घातला जात  आहे. मातंग समाजाचे संरक्षण म्हणून आणि समजावरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता  उस्मानाबाद जिल्हात  भिम-अण्णा सामाजिक संघटना कार्यरत झाली असून महाराष्ट्रात संघटनेचे काम वाढविण्यासाठी रविवारी  तुळजापूर शासकीय विश्रामगृहात संघटनेची बैठक पार पडली. 


या बैठकीत जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारणीत तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते  राजेंद्र मारुती डोलारे यांची उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक सुरेश  भिसे, संस्थापक सल्लागार समिती प्रमुख अशोक जाधव, तुळजापूरचे नगरसेवक किशोर साठे, तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास डोलारे, सुधाकर सगट, आकाश शिंदे,जयराज क्षिरसागर, तानाजी कांबळे, तालुकाअध्यक्ष किसन देडे, किरण कांबळे,किरण पारधे,लक्ष्मण डोलारे, विकास भिसे, जयराज झोंबाडे,विकी झोंबाडे, युवराज भिसे, दिपक भिसे,रवी गायकवाड  पत्रकार संजय गायकवाड,  रुपेश डोलारे आदी समाज बांधव उपस्थित होते.
 
Top