वागदरी, दि .५: एस.के.गायकवा

वागदरी ता.तुळजापूर येथे दि.४ सप्टेंबर २०२१ रोजी कोव्हिड-१९ कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. परंतु लाभार्थी  यांच्या आँनलाईन नोंदणीमध्ये काही तास गोंधळ उडाला.आपल्या मोबाइलवरुन काही व्यक्तीनी  आँनलाईन नोंद करून लस घेतली .पण शासनाच्या आयडी वर त्यांची नोंद झाली नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळणार नाही अशी चर्चा केली जात आहे.
   
प्रारंभी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, ग्रामसेवक जि.आर.जमादार, ग्रा. प.सदस्य रावसाहेब वाघमारे, मुख्याध्यापिका महादेवी जत्ते यांच्या हस्ते आरोग्य किटला पुष्पहार  घालून आरोग्य कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करून लसीकरणास सुरुवात करण्यात आली.   

 यावेळी जि.प.प्राथमिक आरोग्य केंद्र  नळदुर्ग अंतर्गत वागदरी येथे १८ वर्षा वरील सर्वच स्त्री षुरुष व्यक्तीना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस व ज्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस पुर्ण झाले आहेत आशा व्यक्तीना दुसरा डोस देण्यात आला. उत्सपूर्तपणे लस घेण्यासाठी लोकांनी लसीकरण केंद्रात एकच गर्दी केली. पण तज्ञ आरोग्य कर्मचारी नसल्याने कही तास शासनाच्या आयडीवर लसीकरणाची आँनलाईन नोंद करण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे नोंदणीचा गोंधळ उडाला. काही जनानी गुगलच्या मदतीने कोव्हिडच्या वेबसाईटवर आपल्या मोबाइलवरून आँनलाईन नोंद करून लस घेतली, पण ती नोंद संबंधित शासनाच्या आयडीवर न झाल्याने त्यांना सदर लसीकरणाचे प्रमापत्र मिळणार नाही असे समजते. तरी अशा व्यक्तींच्या शासनाच्या आयडीवर पुनश्च नोंदी करून त्यांना लसीकरणाचे प्रमापत्र मिळण्याची व्यवस्था आरोग्य विभागाने करावी अशी मागणी केली जात आहे.
 
Top