लोहगाव खंडाळा प्रकल्प तुडूंब
शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध ८ गावचा पाणीप्रश्न मिटला, प्रकल्पाच्या उंच सांडव्यावरून वहात आहे पाणी
लोहगाव ,दि . ५ : निजाम शेख
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील खंडाळा प्रकल्प १००टक्के भरला असून सांडव्यातून पाणी वहात आहे, त्यामुळे प्रकल्पावर आवलंबून असलेल्या लोहगावसह जळकोट, इंदिरानगर, अलियाबाद, हंगरगा (नळ) ,नंदगाव, बोरगाव, रामतिर्थ, येडोळा,या गावावरील पाणी संकट टळले आहे,
वरिल गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता, गेल्या दोन दिवसात परिसरात झालेल्या दमदार पावसाने प्रकल्प तुडूंब भरला आहे,त्यामुळे नागरीकांतून समाधान व्यक्त केले जात आहे, तसेच निर्गरम्य परिसरात हा खंडाळा प्रकल्प असल्याने या ठिकांनी पर्याटकांची मोठी गर्दी होत असते, प्रकल्पाचे उंच सांडव्यातून पडणारे पाणी,परिसरातील गर्द हिरवीगार झाडी,व येथून जवळच असलेला रामतिर्थ धबदबा तसेच नळदुर्ग बॅरेजेस (डॅम) हा सर्व निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी करतात.