आमदार राणा पाटील यांच्या हस्ते नाभिक समाज सभागृह भूमिपूजन

संत सेना महाराज सभागृहासाठी 10 लाख आमदार फंड जाहीर


 तुळजापूर , दि .५ : 

महाराष्ट्र नाभिक महामंडळ, तुळजापूर यांच्या वतीने आयोजित पुण्यतिथी निमित्ताने नाभिक समाजातील शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, क्रीडा व कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नाभिक समाज बांधव व महिला भगिनींना श्री संत सेना महाराज 'समाज सेवारत्न' पुरस्कार देऊन आमदार राणाजगजीतसिंह पाटील त्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कुंभार गल्ली यथील आरक्षित जागेवर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते फलकाचे अनावरण आणि नियोजीत सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले.श्री संत सेना महाराज सभामंडपासाठी 10 लाख आमदार निधी देण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.


सराया धर्मशाळा येथे आज दि.3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता तुळजापूर पोलीस ठाणे निरीक्षक अजिनाथ काशीद यांच्या उपस्थितीत श्री संत सेना महाराज मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम पार पडला, तसेच दि.4 सप्टेंबर रोजी यावेळी ह.भ.प.प्रकाश महाराज गवळी यांची कीर्तनसेवा पार पडली, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत गुलाल कार्यक्रम, महाआरती व नाभिक समाजरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात  सुमित पंडित पूजा पंडित औरंगाबाद, विठ्ठल गायकवाड उस्मानाबाद, सुरेश राऊत, सविता क्षीरसागर,प्रकाश गवळी महाराज, विष्णु दळवी, प्रितेश डाके,अनिल आगलावे, प्रज्योत कावरे, कु.सुप्रिया बडोदकर,गार्गी कावरे यांना नाभिक समाजरत्न सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, सज्जन साळुंखे,विनोद गंगणे, शाम पवार, सुधीर कदम,ऋषिकेश मगर, आनंद कंदले, अविनाश गंगणे,गुलचंद व्यवहारे, निलेश रोचकरी, मिलिंद रोकडे, किशोर साठे, विजय कंदले, अभिजित कदम,नाभीक महामंडळ जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,जिल्हा सरचिटणीस दाजी पवार,मराठवाडा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पंडित,ओबीसी जिल्हाध्यक्ष सुखदेव भालेकर,विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे,पत्रकार प्रशांत कावरे यांच्यासह तुळजापूर शहर व तालुक्यातील नाभिक बांधव  उपस्थित होते.
 
Top