नळदुर्ग , दि .२७ : 


 कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथे पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासन उपसंचालक प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद आणि नळदुर्ग  महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन दिनाच्या निमित्ताने एक दिवसीय शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर  तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक  एम. एम. शहा, निसर्ग माझा सखा सोलापूरचे कार्याध्यक्ष  स्वप्नील चाबुकस्वार, इको नेचर क्लब सोलापूरचे अध्यक्ष  मनोज देवकर, इतिहास संशोधक लेखक व  नळदुर्ग या किल्ल्यावरती लेखन करणारे  जयराज खोचरे, उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
     

प्रारंभी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. आलेल्या मान्यवरांचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर, उपप्राचार्य  ढोकळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. संजय कोरेकर बोलताना म्हणाले की, आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा असेल, ताणतणावातून मुक्त होऊन निखळ आनंद घ्यायचा असेल तर पर्यटनाच्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळांना या भेटी दिल्या गेल्या पाहिजेत. पर्यटनामुळे जास्तीत जास्त आपल्या ज्ञानात भर पडून चिरकाल स्मरणात राहते. आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात त्यासाठी पर्यटन आवश्यक आहे. असे ही मत त्यांनी मांडले.


 स्वप्निल चाबुकस्वार यांनी पर्यटनाच्या दृष्टीने आपला जन्म महाराष्ट्रात झाल्याने आपण खूप भाग्यशाली आहोत. निसर्ग सौंदर्यानं भर घातलेली ही भूमी जशी डोळे दिपवून घेते तसे डोंगरदर्‍यांनी घनदाट अरण्यानी आणि विविध गड-किल्ल्यांनी व्यापलेला हा प्रदेश जेव्हा आपल्या नजरेखालून घालू व त्याचा आस्वाद मनापासून घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने जन्माला आल्याचे सार्थक झाले असे वाटेल. म्हणूनच निसर्गानं भरभरून दिलेलं हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी, आपल्या आयुष्यात येऊन पर्यटन केले पाहिजे असेही त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.


 मनोज देवकर यांनी आपले अनुभव कथन करत असताना पर्यावरण संवर्धन हेसुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला साधता येते. हेही त्यांनी आवर्जून सांगितले ज्या ऐतिहासिक स्थळांना आपण भेट देऊ त्या त्या ठिकाणी आपल्याला पर्यावरण संवर्धन राखत असताना आजूबाजूला जो घनकचरा किंवा इतर गोष्टी आपण टाकतो ते कटाक्षाने  टाळण्याचा जर प्रयत्न स्वतःपासूनच केला तर सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक आनंद आपल्याला नक्कीच मिळेल. जवळपास एक लाखाच्यावर संस्थेच्या माध्यमातून आपण वृक्षाची लागवड केल्याचे आवर्जून त्यांनी सांगितले. विविध औषधी वनस्पती ह्या लागवडीसाठी वापरल्याचे त्याने आवर्जून सांगितले. 
     

जयराज खोचरे याना मुळातच आवड ही संशोधनाची असल्याने, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अशा विविध स्थळांचा उल्लेख त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करत असताना या सर्व स्थळांना  भेटी देणे हे क्रमप्राप्त आहे. पर्यटन म्हणून बराचसा भाग आपल्याला या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आवर्जून पाहता येईल असेही त्यांनी सांगितले. नळदुर्ग किल्ल्याचे वर्णन करत असताना त्यांनी नळदुर्ग  किल्ल्यातले बरेच बारकावे नजरेस आणून दिले. त्याच बरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, धाराशिव लेणी ,  सावरगाव, रामतीर्थ, अचलबेट, अणदूर, चिवरी, तिर्थ(बु),  अशी कितीतरी ऐतिहासिक स्थळांची माहिती त्यांनी सांगितले. आणि ते आपल्याला पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या आयुष्यात पर्यटन करणे खुप महत्वाचे आहे. 

 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश शेरे यांनी मानले. यावेळी डॉ. सुभाष राठोड, डॉ.रोहिणी महिंद्रकर,  डॉ.महेंद्र भालेराव, डॉ. तुळशीराम दबडे, डॉ. लक्ष्मण थिट्टे,  डॉ. अशोक कांबळे व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात   उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागिनाथ बनसोड, काशिनाथ कोळी, लिंबराज बेले, अतुल बनसोडे, सुरेश गायकवाड व सिद्धू सुतार यांचे सहकार्य लाभले.
 
Top