काटी, दि.१५ :
महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत काटी ता . तुळजापूर येथील सौरभ भागवत गवंदारे याने घवघवीत यश मिळविले आहे. सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत असलेल्या सौरभने सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सौरभ हा काटी येथील माजी सैनिक भागवत गवंदारे यांचा सुपुत्र आहे.
सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचा सौरभ हा विद्यार्थी आहे. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्याने 97.78 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. या तंत्रनिकेतनमधून एकूण 72 विद्यार्थी बसले होते. त्यात 97. 78 टक्के गुण मिळवून तो सोलापूर जिल्ह्यात प्रथम आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही गुणवत्तेत कमी नाहीत, हेच सौरभने या यशाच्या माध्यमातून सिद्ध केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.