कळंब , दि . १५


कोरोना काळात जसा मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. त्याचप्रमाणे शिक्षकांनाही अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. पण काही शिक्षक असे आहेत. त्यांनी आपल्या कामावर लॉकडाऊनचा प्रभाव न पडू देता आपलं काम सुरू ठेवलं आहे. अशाच कळंब तालुक्यातील इटकूर केंद्रा अंतर्गत  जिल्हा परिषद प्राथमिक भोगजी शाळेतील बाबासाहेब पांडुरंग उबाळे या शिक्षकाने भोगजी शाळेचे मुख्याध्यापक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन, मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. 


जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांच्या कामामुळे सर्वचजण प्रभावित झाले आहेत. या शिक्षकानं आपल्या शिकवण्याच्या कामात खंड न पडू देता घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना  शिक्षण देण्याचं कार्य सुरू ठेवलं आहे. सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे अवघड झाले आहे. ऑनलाईन शिक्षण किती विद्यार्थ्यांना समजेल याबद्दल साशंकता असल्याने त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शासकीय नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांचे कुठलेही शालेय नुकसान होऊ नये या हेतूने मास्कचा वापर करत सहशिक्षक बाबासाहेब उबाळे यांनी घरोघरी जाऊन शिक्षण देण्याचा मार्ग निवडला आहे. 


त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळा बंद असल्याची उणीव भासत नसून त्यांना शिक्षणाचे धडे घरीच मिळत असल्याने विद्यार्थ्यी व पालकांमधून समाधान व्यक्त होत असून शाळेचे मुख्याध्यापक चौधरी व सहशिक्षक बाबासाहेब उबाळे यांचे कौतुक होत आहे.
 
Top