काटी , दि . ०३ 

तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेले व नागरिकांना उत्कृष्ट सेवा देणारे सुरतगाव सज्जाचे तलाठी आबासाहेब सुरवसे यांची काटगाव येथे बदली झाल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच तथा जेष्ठ नागरिक भागवतराव गुंड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करुन निरोप देण्यात आला. तर त्याठिकाणी नवीन रुजू झालेले तलाठी सुरेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले.


         
यावेळी उपसरपंच बाबासाहेब गुंड, आबासाहेब सुरवसे,सुरेश पाटील, सोपान कदम  यांनी मनोगत व्यक्त केले.

 यावेळी मंडळ अधिकारी बाळासाहेब जगताप, माजी सरपंच तथा जेष्ठ नागरीक भागवतराव गुंड,सेवानिवृत्त पोलीस पाटील नागनाथ पाटील,  गोवर्धन गुंड, विठठल गुंड, पंडीत काळे,गजेंद्र बोचरे, सोपान कदम,चंद्रकांत माळी,पांडूरंग गुंड, कुमार गुंड, दत्ताञय नकाते, रामहरी गुंड,सुभाष कदम,शहाजी पाटील, बालाजी देवकर, सद्दाम शेख, ज्ञानेश्वर राऊत, मोहन नकाते, मारुती गुंड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top