तुळजापूर , दि, ३
तुळजापूर तालुक्यातील शिराढोण येथील शेतकरी विजय सुरवसे यांना गुरुवारी मध्यरात्री सर्पदंशाने उस्मानाबाद येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार चालू असताना शुक्रवारी सकाळी ११ वाजून १६ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.
तुळजापूर तालुक्यातील शिराढोण येथे आपल्या शेतामध्ये नागनाथ विश्वनाथ सुरवसे आणि त्यांचा मुलगा विजय नागनाथ सुरवसे ( वय २६ ) दोघेही शेतात झोपले असताना विजय सुरवसे यांना सर्पदंश झाल्यामुळे तातडीने त्याला उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. शुक्रवारी सायंकाळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.