जळकोट, दि.३ :
उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे मांजरा प्रकल्प , भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी शिरिष यादव यांची परभणी येथे प्रशासकीय बदली झाल्याबद्दल उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात जळकोट (ता. तुळजापूर) येथील ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
शिरीष यादव यांनी आपल्या पदाच्या कार्यकाळात नॅशनल हायवेसाठी भूसंपादन प्रक्रिया प्रभावीपणे राबवून वंचित प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यादव यांची ओळख आहे. त्यांची नुकतीच परभणी येथे प्रशासकीय बदली झाली आहे. या बदली निमित्त जळकोट ग्रामस्थांच्यावतीने उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेनेचे तुळजापूर तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सहचिटणीस महेश कदम, मेघराज किलजे, शिवसैनिक बाळासाहेब जाधव , अनिल भोगे, हरून पटेल, दत्ता पांचाळ, चनबस कुंभार, अंकुश मुडबे , गोरख देशमुख आदी उपस्थित होते.