परंडा, दि . १०: फारुक शेख
शुक्रवारी परंडा तालुक्यातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी व घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना उत्साहात केली.
पोलीस प्रशानाने सर्व नागरीकाना जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन सर्व गणेश भक्तांना , मंडळाना करून सकाळपासूनच परंड्यांत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
गणपतीची मुर्ती व पुजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग गर्दी पाहवयास मिळाली.
शहरातील विविध मंडळांनी
श्रींचे स्वागत करून मंचावर गणपतीची मुर्ती विराजमान केली. बालगोपाळासह महिला व आबाला वृध्दांनी यावर्षी गणेश उत्सव साजरा करण्यास सहभाग घेतना दिसून आला.
परंडा शहरात गणेशोत्सवामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण असून सार्वजनिक गणेश मंडळात सुंदर देखावे निर्माण करण्यात आले.
सकाळपासूनच गणपतींची मूर्ती खरेदी करण्यास नागरीकांचा उत्साह असल्यामुळे या भागात गणेश मूर्ती खरेदीदारांची संख्या आधिक होती.
बाप्पांच्या आगमनाची तयारीला
आज सुरूवात विविध भागातून
मूर्ती विक्री करणारे स्टॉल आठवडा बाजारात लावले होते. पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, व डेकोरेशन व पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवडय़ाचे पान, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना आज चांगली मागणी होती.त्यामुळे नागरिक कोरोनाचे सावटाखाली शासनाचे सर्व नियम पाळताना दिसुन आले.