तुळजापूर , दि .१० : 


उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे उभारण्यात येणारा ऑक्सिजन प्लँटचे काम प्रगतीपथावर आहे . जि.व्ही.एस.इंडिया प्रायवेट लिमिटेड (बारामती) या कंपनीने हे काम घेतले आहे, 13 के.एल. क्षमता असणाऱ्या सदरील प्लँट मुळे तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय, कोविड सेंटर यांना ऑक्सिजन बाबतीत चिंता राहणार नाही, 

यावेळी कंपनीच्या संबंधित अधिकारी यांच्याशी प्लँट बाबतीत विस्तृत माहिती घेतली व तत्काळ काम पूर्ण करावे असे रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले यांनी सांगितले, यावेळी डॉ. श्रीधर जाधव उपस्थित होते.
 
Top