उमरगा, दि .१०
तालुकयातील जकेकूर येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात १० सप्टेंबर रोजी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा या शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्सहात साजरा करण्यात आला.
विठ्ठलसाई स. सा. कारखाना मुरूमचे संचालक श्री.विठ्ठलराव पाटील यांच्या हस्ते, सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व्ही.टी. घोडके, सहशिक्षक प्रदिप समाने, संतोष कांबळे, संतोष बिराजदार आदी उपस्थीत होते. यावेळी व्हि. टी. घोडके यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा आपल्या मनोगतातून मांडला.
या वेळी विठ्ठलराव पाटील, प्रदीप समाने, संजय बिराजदार यांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थी , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.