काटी , दि . १० : 

डॉक्टर व आरोग्य सेवा अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेली सेवा व पिंपळा बुद्रुक ता .तुळजापूर  येथे दिलेल्या सेवेबद्दल पिंपळेकरांतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. 

तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, सदस्य संग्रामसिंह राजे पांढरे, गीता वाघमोडे ,पोलीस पाटील महादेव नरवडे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.

पिंपळा येथे एकूण २९३ व्यक्तिंना लस देण्यात आली. यामध्ये प्रथम डोस घेणारे २०० व्यक्ती व दुसरा डोस घेणाऱ्या ९३ व्यक्तींचा समावेश होता. सामाजिक संकटकाळात डॉक्टर्स, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे योगदान खूप मोठे आहे. रुग्णांची अहोरात्र मेहनत करून सेवा करणे, नागरिकांना धीर देणे , त्यांचे मनोबल उंचावणे, लसीकरणासाठी प्रबोधन करून प्रवृत्त करणे यातून जणू त्यांनी मानवधर्माचा परिचय दिला आहे. त्यांच्या या सेवेचा गौरव म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्या सेवेचा गौरव केला.


वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र पुंडे ,यशवंत कदम ,गोप जी. एल.  शिंदे बी.एम. , श्रीमती आशा पाटील, श्रीमती गोरे, सुनंदा मस्के ,अनिता धोतरकर या आरोग्य टीमचा गौरव झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री विठ्ठल नरवडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महादेव नरवडे, बालाजी चौगुले, परवेज शेख, संग्राम राजेपांढरे, आकाश चौगुले ,नागनाथ नरवडे ,नागनाथ जाधव सुधाकर वाघमोडे, अरविंद पाटील ,संजय डोलारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
 
Top