नळदुर्ग , दि . १० 

राज्य शासनाच्या महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावर ऑनलाइन पिकाच्या नोंदणीसाठी "माझी शेती, माझा सातबारा,मीच नोंदविणार माझा पीकपेरा" उपक्रमांतर्गत ई-पीक पाहणी या स्वतंत्र मोबाईल अॕपलिकेशनची निर्मिती केली. दि .१५ ऑगस्टपासून ई पीक पाहणी हे ॲप लाँच केले आहे..या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या पीक पेऱ्याची नोंदणी करावी याबाबत शुक्रवारी तुळजापूर तालुक्यातील  होर्टी येथे तलाठी जी.डी.जगताप यांच्याकडून जनजागृती करण्यात आली.

 होर्टी ता. तुळजापूर  येथे एकूण 1 हजार 266 खातेदार असून या सर्व खातेदारांनी आपल्या सातबार्‍यावर पिकपेरा नोंदणी करणे आवश्यक आहे. या पिकपेरा नोंदणीबाबत तुळजापुर तालुक्यातील होर्टी गावातील शेतकऱ्यांच्या थेट शेतात जाऊन मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबाऱ्यावर पिक पेरा नोंदणी करणे गरजेचे आहे. अशी माहिती तलाठी जी.डी जगताप. यांनी सांगितले. यावेळी गावातील शेतकरी अनिल भोसले,  सरपंच पती संजय गुंजिटे, गिरी तुगावे, महादेव पाटील, सागर कुंभार, बाळु मुळे आदीजन उपस्थित होते.
 
Top