वागदरी , दि . १० : 

येडोळा ता.तुळजापूर  येथे  बोरी नदीवर पुलाचे बांधकाम त्वरित करावे या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले) शाखा येडोळाच्या वतीने सोमवार दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता लक्षवेधी जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.


 नळदुर्ग येथून निघणारी बोरी नदी ही येडोळा गावा जवळून वहाते. पावसाळ्यात बोरी नदीला पुर आला की,येडोळा गाव ते येडोळा पाटी (कंदुरमळा) हा रस्ता बंद होऊन दैनंदिन व्यवहाराचे मुख्य ठिकाणी असलेल्या नळदुर्गचा संपर्क तुटतो.व येथील ग्रामस्थासमोर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे या नदीवर येडोळा गाव ते  पाटी या रस्त्याला जोडणाऱ्या नवीन पुलाचे बांधकाम त्वरित सुरू करावे या मागणीकरीता रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा युवा आघाडी कार्याध्यक्ष अरूण लोखंडे, तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, जेष्ठ कार्यकर्ते राम लोंढे आदींच्या उपस्थितीत रिपाइंच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे.

 तरी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे असे आवाहन  तालुका संघटक सुरेश लोंढे, शाखा अध्यक्ष देवानंद लोंढे, उपाध्यक्ष मारूती लोंढे ,सचिव भानुदास लोंढे, सोपान गायकवाड, प्रविण कांबळे, सुरज लोंढे, मित्र पक्ष भाजपचे नवनाथ जाधव आदींनी केले आहे.
 
Top