काटी , दि . १०


तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील जि.प.प्रा.शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती कांचन काशिद पाटील यांना एकता फाऊंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार हा नुकताच जाहीर करण्यात आला आहे.


 कांचन काशिद यांची प्राथमिक शिक्षक म्हणून प्रथम नेमणूक जि प प्रशाला सावरगाव येथे झाली व सलग 10 वर्ष तेथेच सेवा केल्यानंतर जि प प्रा शाळा तामलवाडी येथे दोन वर्ष झाल्यानंतर जि प प्रा.शाळा केमवाडी येथे कार्यरत आहेत.


 सेवेत असतांनाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र-रा प महाविद्यालय उस्मानाबाद येथून बी.एड. उत्तीर्ण  केले.तर सोलापूर विद्यापीठातून एम ए इंग्लिश पूर्ण केले. शाळेतील शालेय उपक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग, शालेय परिसरात वृक्षारोपण, विद्यार्थ्यांच्या   सर्वांगीण विकासासाठी शिकू आनंदे उपक्रमात सहभाग, शाळेत कोवीड काळात कोरोनाच्या नियमाचे पालन करीत 10 विद्यार्थ्यांचे गट निहाय अध्ययन आदी उपक्रम विध्यार्थी केंद्र बींदु माणून सहभाग घेतात.तसेच नवोदय,स्कॉलरशिप इ.स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून उत्तम तयारी करून घेतात.
 
Top