नळदुर्ग , दि . १० : सुहास येडगे
शहरातील रस्त्याच्या कामासाठी न. प. प्रशासनाच्या निषेधार्थ दि .१३ सप्टेंबर रोजी रस्त्यावर बेशरमाचे झाडे लागवड करुन शिवशाही मंडळ निषेध करणार असल्याची माहिती दिले आहे.
मराठा गल्लीतील रस्त्याची झालेली दयनिय पाहता गत चार वर्षापासून नागरीकांतून रस्त्याची मागणी करण्यात येत आहे. माञ उदासिन न.प. प्रशासन , लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे अद्यापपर्यंत काम करण्यात आले नाही. त्यामुळे या रस्त्याच्या मागणीसाठी शिवशाही तरुण मंडळाच्या वतीने दि. १३ सप्टेबर रोजी चावडी चौक ते मराठा गल्ली पर्यंत बेशरम लागवड करुन नगपालिकेचा निषेध करणार ? आसल्याचे निवेदन मंडळाच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
गेल्या चार वर्षापासून मराठा गल्लीतील ज्ञानेश्वरी पारायण कटटयासमोर व पाँचपीर चौकापासून ते मराठा गल्लीपर्यंतचा मुख्य मिरवणूक मार्ग उखडून गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन नागरीकांना जाताना येताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, दरम्यान या रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या चार वर्षापासून संबंधीत नगरसेवकाकडे व पालिकेच्या सत्ताधारी पदाधिकारी याच्या कडे वारंवार मागणी केली, परंतु या नगारीकांच्या मागणीला केराची टोपली दाखवून सत्तेचा माज आलेल्या पदाधिकारी यांनी मराठा गल्लीतील नागरीकांवर जाणीव पूर्वक रस्ता न करता आन्याय केला आहे.
मराठा गल्ली मध्ये १९४३ सालापासून शिवशाही तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करण्यात येत आहे, त्याच बरोबर गेल्या पस्तीस वर्षापासून शांतादेवी नवरात्र महोत्सव साजरा केला जाता आहे आणि गेल्या पन्नास वर्षापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ही या ठिकाणी साजरा केला जातोय परंतु अशा सांस्कृतीक व धार्मीक कार्यक्रमांची सतत सोहळे होत आसताना पालिका प्रशासनाने मात्र गल्लीकडे गेल्या चार वर्षापासून दुर्लक्ष केले आहे. या ठिकाणी गेल्या चार वर्षात एक टोपले ही टाकून विकास कामे केले नाहीत, त्यामुळे शेवटी शिवशाही तरुण मंडळाकडून पालिका प्रशासनाने मराठा गल्लीतील नागरीकांनी व शिवशाही तरुण मंडळाने केलेल्या मागणीचा विचार करुन तात्काळ रस्ता तयार करुन मराठा गल्लीतील नागरीकांना दिलासा दयावा. कारण या ठिकाणी जेष्ठ नागरीकांना विठठल मंदीरात दर्शनासाठी या रस्त्यावरुन जाता येत नाही शिवाय गेल्या पन्नास वर्षाच्या इतिहासात ज्ञानेश्वरी पारायण सोहळयातील पालखी मिरणूकीतील पालखी कधी ही पडली नाही मात्र गेल्या वर्षी या उखडलेल्या रस्त्यामुळे पारायण सोहळयातील पालखी नाचविताना रस्ता फुटल्यामुळे पडली. त्यामुळे पालिकेचा व पदाधिकारी आणि संबंधीत नगरसेवकाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी दि. १३ सप्टेबर रोजी येथील चावडी चौकापासून ते मराठा गल्लीपर्यंत रस्त्यावर बेशरमाचे झाडे लावून पालिकेचा निषेध केला जाणार आहे.
निवेदन शिवशाही तरुण मंडळाकडून मुख्याधिकारी यांना देण्यात आले असून या निवेदनावर शिवाशाही तरुण मंडळाचे अध्यक्ष पंकज हजारे, उपाध्यक्ष निखील येडगे, श्रीकांत सावंत, कोषाध्यक्ष संतोष मुळे, सचिव सहदेव जगताप, सहसचिव आकाश काळे यांच्यासह जेष्ठ नागरीक व इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.