उमरगा , दि .१० :
उमरगा तालुक्यातील
एकुरगावाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सोयाबीन व तूर या पीक संदर्भात गुरुवारी शेती शाळाचे आयोजन करण्यात आले.
आयोजित शेती शाळेत प्रशिक्षक सुलक्षणा गोडसे यांनी तूर पिकावर आच्छादन करणे तसेच सोयाबीन पिकावर येणाऱ्या बुरशी आणि बुरशीनाशके याबद्दल
शेतकऱ्यांना सविस्तरपणे मार्गदर्शन केले. यावेळी अनिल जाधव, जोतिराम औरादे उपस्थित होते. तसेच गावकऱ्यांनी शेती शाळेला उत्सर्फुत प्रतिसाद दिला.