उस्मानाबाद , दि .०९ एस.के.गायकवाड


रिपाईचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांचा वाढदिवस वेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला असून वाढदिवसानिमित्ताने येथील रिक्षा चालकाना. प्रत्येकी एक लिटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात आले.


उस्मानाबाद येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज , यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  शासकीय विश्रामग्रहात रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आभिष्ठचिंतनाच्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते रिपाइं कार्यकर्त्यांच्या वतीने राजाभाऊ ओहाळ यांचा शाल ,फेटा, पुष्पहार,पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आले.
  
 याप्रसंगी येथील रिक्षा चालकाना प्रत्येकी एक लिटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात आले .यावेळी रिपाइंचे राज्य सचिव संजय बनसोडे, मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, सचिव बंडू बनसोडे, जिल्हा संपर्क प्रमुख विद्यानंद बनसोडे, जिल्हासंघटक सचिव सोमनाथ गायकवाड, जिल्हा सचिव सचिन शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष संपतराव जानराव, रंजित गायकवाड, शहराध्यक्ष उदयराज बनसोडे, शहर उपाध्यक्ष आकाश इंगळे, बाळासाहेब माने,योगेश बनसोडे,तानाजी सोनवणे, आकाश बनसोडे, महादेव भोसले, श्रीकांत मटकीवाले,मुकेश मोठे, गौतम कांबळे,स्वराज्य जानराव, यशवंत माळाळे, बाळासाहेब सरवदे, बाबासाहेब कदम, प्रतिक कदम,अजय आवाड,मिलिंद सोनवणे, सुहास झेंडे, पलाश मानेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top