जळकोट, दि.८ मेघराज किलजे
सध्या महसूल विभागाकडून सर्वञ अद्यावत तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्याकडून ई- पीक पाहणी या ॲपद्वारे आपल्या पिकांची नोंद करून घेण्यात येत आहे. या पीक पेरा नोंदीबाबत तुळजापूर तालुक्यातील जळकोट महसूल मंडळाच्या गावातील शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मंडळाधिकारी पी.एस. भोकरे यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.
शेतकर्यांनी आपल्या शेतातील पिक पेराची नोंद स्वतः करून घेण्यासाठी ई -पीक पाहणी अँप निश्चित करण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांना ही पद्धत सोपे जाण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. शासनाच्या अनुदान, पिक विमा, पिक कर्ज आदि योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद घेणे आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. यापूर्वी शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची नोंद हे तलाठी करत असत. परंतु महसूल विभागाने शेतकऱ्यांनाच याचे अधिकार देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी ई -पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून शेतकऱ्याचे नाव, गट नंबर, पिकाचे क्षेत्र, विहीर व बोरवेल नोंद आदी माहितीची नोंद करावी. या ॲपबद्दल व शेतकऱ्यांनी माहीती कशी भरावी याबाबत जळकोट महसूल मंडळाचे मंडळाधिकारी पी.एस. भोकरे यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन जळकोट, जळकोटवाडी, लोहगाव, हंगरगा, सलगरा , बोरगाव आदि गावातील शेतकर्यांना प्रशिक्षण दिले. व प्रत्यक्ष काही शेतकऱ्यांचे पिक पाहणीद्वारे पिकांची नोंद केली.
यावेळी पी.एस. भोकरे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद घेण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा. स्वतःच्या शेतात जाऊन स्वतःच्या शेतातील पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची नोंद करावी. यापुढे प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांनी आता पुढाकार घ्यायचा आहे. प्रत्येक गावातील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना माहिती भरण्यासाठी मदत करावी. गावातील विविध शिवारात गट तयार करुन गावातील सर्व शेतकऱ्यांचे १००% नोंदी पूर्ण करून घ्यावेत.दि.१४ सप्टेंबर पूर्वी या नोंदी पूर्ण होण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे.
जळकोट - जळकोटवाडी येथील प्रशिक्षणास या भागातील शेतकरी, श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाचे अध्यक्ष व पत्रकार मेघराज किलजे, लोहगावचे तलाठी एम.एस. गायकवाड, हंगरगा (नळ ) तलाठी जोगदंड, देविदास राठोड, मल्लिनाथ मडोळे, बालाजी पालमपल्ले, मालिनाथ किलजे, बाबुराव कुंभार, डांबरे, कांबळे आदी शेतकरी उपस्थित होते.