इटकळ , दि . ०८
स्मशानभूमीच्या जागेवरून तणाव निर्माण झाल्याने मृतदेह १५ तासापासून अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे बुधवार रोजी घडली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार निलेगाव ता .तुळजापूर येथे एका वृध्द महिलेचे निधन झाल्याने त्याच्या अत्यंविधीवरुन वाद झाल्याने तणावाची परिस्थिती
निर्माण झाली. यावेळी तुळजापूरचे तहसीलदार, पोलीस उपअधिक्षक ,यांनी गावक-याशी चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. परंतु गावकरी आगोदरच्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यावर ठाम आसल्याने गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे बांधलेली स्मशानभूमी शेतक-याने तीन वर्षा पुर्वी सातबा-यावर नोंद नसल्याने पाडली होती. तेव्हा पासुन येथील स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रशासकीय पातळीवरुन संबंधित शेतक-यानी पर्यायी जागाही दिली.परंतु ती जागा मान्य नसल्याने आगोदरच्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यावर गावकरी ठामआहेत.
सुंदराबाई नागप्पा दुधभाते वय ७५ वर्ष यांचे दि ८ सप्टेंबर रोजी पाहटे निधन झाले. पुर्वीच्या ठिकाणी अत्यंविधी करण्यासाठी सरपण टाकताना हाणामारी झाली. यामुळे तणाव निर्माण झाल्याने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत गावामध्ये दाखल झाले, तहसीलदार सौदागर तांदळे, तुळजापूर पोलीस उपविभागीयअधिकारी अंजुम शेख या निलेगावामध्ये दाखल झाल्या आहेत. राखीव पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.
तणाव निवळला
निलेगाव ता.तुळजापूर येथील तणाव निवळला असुन
एक वेळा आगोदरच्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास तहसीलदारांनी परवानगी दिल्याने अंत्यसंस्कार करण्यात आले.