अणदूर , दि . ०८
अणदुर ता . तुळजापूर येथे शिक्षणमहर्षी ,माजी आमदार कै. सि.ना.आलुरे गुरूजी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी जवाहर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,अणदूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जवाहर परिवार व महात्मा बसवेश्वर महाराज जन्मोत्सव समिती,अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सदरील शिबिरात 166 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अध्यक्षस्थानी सरपंच रामचंद्र आलुरे हे होते.शिबीराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्राचार्य डाॅ.उमाकांत चनशेट्टी ,मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे ,जन्मोत्सव समितीचे सोमनाथ शेटे, श्रीशैल चौधरी, राचप्पा जिडगे, उमाकांत आलुरे, यश कर्पे, अश्विनी रक्तपेढीचे डाॅ.सिद्धार्थ, डाॅ.प्रद्युम्न, डाॅ.भारत, डाॅ.नागार्जुन जिंकले ,उपसरपंच डाॅ,कुंभार, डाॅ.जितेंद्र कानडे, सिद्रामप्पा खराडे, डाॅ.विवेक बिराजदार आदी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे उदघाटक जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण व कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रामचंद्र आलुरे, यांनी कै.सि.ना.आलुरे गुरूजी यांच्या प्रतिमेचे पुजन करून व दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबीराचे उदघाटन संपन्न केले.
पन्नास पेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा बाबुराव भाऊ चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबीराचे संयोजक व प्राचार्य डाॅ. चनशेट्टी यांनी प्रास्ताविकपर भाषणात रक्तदानाचे महत्व सांगीतले.
उदघाटनपर भाषणात बाबुराव चव्हाण यांनी, शिक्षणमहर्षी कै.सि.ना.आलुरे गुरूजी यांनी आपल्या जीवनात रूग्ण सेवेचा वसा घेतला होता.तो वारसा या रक्तदान शिबीराने संपन्न होतो आहे. ही दिलासा देणारी बाब आहे.
अध्यक्षीय समारोपात करताना रामचंद्र आलुरे म्हणाले कि, बाबांना अभिवादन करण्यासाठी रक्तदानासारखे रूग्णांना जीवनदान देणारे कार्य करत आहात, त्याबद्दल मी आपले श्रण व्यक्त करतो. असेच रूग्णसेवेचे कार्य अखंडपणे घडावे यासाठी शुभेच्छा देतो.व जास्तीत जास्त तरूणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा सांगितले .
संयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांना कै.सि.ना.आलुरे गुरूजींची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.एम.बी.बिराजदार यांनी तर आभार प्रदीप कदम यांनी मानले.