नळदुर्ग , दि .०८ : सुहास येडगे

महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियमधीन करण्याच्या नावाखाली नळदुर्ग नगरपालिकेत गेल्या वर्षभरात बेकायदेशीर व नियमबाह्य गुंठेवारी नियमधीन करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. त्याचबरोबर बनावट नकला तयार करूनही रजिस्ट्री करण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षभरात नळदुर्ग नगरपालिकेत झालेल्या गुंठेवारीची चौकशी करावी जोपर्यंत चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत ही झालेली गुंठेवारी नियमधीन करू नये अशी मागणी होत आहे.महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियमधीन करण्याच्या नावाखाली नळदुर्ग येथे जमिनीचे असंख्य तुकडे पाडुन गुंठेवारी करण्याचा सपाटाच गेल्या वर्षभरात झाला आहे. नियमबाह्य व बेकायदेशीरपणे ही गुंठेवारी करण्यात आली असुन अनेक ठिकाणी बनावट नकला तयार करून रजिस्ट्री करण्यात आली आहे. ही बाब अतीशय गंभीर असुन याची चौकशी होणे गरजेचे आहे. नगरपालिकेत कांही सुपारी बहाद्दर दलाल गुंठेवारी करून देण्यासाठी नगरपालिका कार्यालयात ठाण मांडुन बसलेले असतात. या दलालामार्फत गेल्या वर्षभरात नगरपालिकेने मोठ्याप्रमाणात गुंठेवारी नियमधीन केली आहे. गुंठेवारी करण्याच्या कामात मोठा गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कांही ठिकाणी तर ग्रीनझोन असणाऱ्या क्षेत्रातीलही गुंठेवारी करण्यात आली आहे. 

वास्तविक पाहता ग्रीनझोन क्षेत्रात गुंठेवारी करता येत नाही हा नियम आहे. मात्र नियम धाब्यावर बसवुन नळदुर्ग येथे गुंठेवारी करण्यात आली आहे. या गुंठेवारीच्या आधारावर पुढे रजिस्ट्री करण्यात आलेल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार ही गुंठेवारी न करता शासनाच्या नियमाचा आधार घेत नियमबाह्य व बेकायदेशीरपणे गुंठेवारी करण्यात आली आहे.अनेक प्रकरणात बनावट नकलाही तयार करण्यात आलेल्या आहेत. बनावट नकला तयार करणारे एक रॅकेट सध्या नळदुर्ग शहरात सक्रीय झाले आहे. गुंठेवरीच्या बनावट नकला तयार करून त्याच्या आधारे पुढे रजिस्ट्रीही करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे  गेल्यावर्षभरात नळदुर्ग नगरपालिकेने ज्या गुंठेवारी केलेल्या आहेत त्या सर्व गुंठेवारी प्रकरणाची चौकशी करून यामध्ये जे नियमबाह्य व बेकायदेशीर गुंठेवारी करण्यात आलेली आहे ती गुंठेवारी रद्द करून यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


 अनेक वर्षे रखडत पडलेल्या गुंठेवारी गेल्या वर्षभरात मोठ्याप्रमाणात करून या गुंठेवारीच्या माध्यमातुन माया गोळा करण्याचे काम नगरपालिकेत कोण केले याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नगरपालिकेत सध्या गुंठेवारी करून देण्यासाठी जे दलाल सक्रीय झाले आहेत त्यांना कोण पाठबळ देत आहे याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.नियमबाह्य गुंठेवारी करून त्याआधारे ज्या रजिस्ट्री झालेल्या आहेत त्या सर्व रद्द करण्याबरोबरच यापुढील काळात जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत नळदुर्ग मधील यापुढील काळात गुंठेवरीच्या आधारे होणाऱ्या रजिस्ट्री तोपर्यंत थांबविणे गरजेचे आहे.
 
Top