तुळजापूर दि ७
शहरातील शिवपार्वती मंगल कार्यालयात कोवीड १९ नियमाचे अवलंब करुन नोंदणीकृत मर्यादित ५० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत जिल्हा संस्कार भारती ,महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे शाखा उस्मानाबाद जिल्हा कलाध्यापक संघ, शिव पार्वती मंगल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक गणेशमूर्ती साकार स्पर्धा संपन्न झाली.
प्रथम शिक्षक दिन असल्याने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन , श्री तुळजाभवानी प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन जिल्हा संस्कार भारतीचे श्यामसुंदर भन्साळी ,प्रभाकर चोराखळीकर , कोषप्रमुख अरविंद पाटील, अविनाश धट हस्ते पुजन करण्यात आले.
स्पर्धक प्रतिनिधत्व म्हणून चि.प्रथमेश प्रदिप अमृतराव यांचाही याप्रसंगी स्वागत सन्मान करण्यात आला.
डॉ. सतिश महामुनी यांच्या प्रास्तविक पर भाषाणानंतर वैराग येथील शिल्पकार सुहास सुतार यांनी मुंबई मातीपासून श्रीगणेशमुर्ती साकाराण्याचे प्रात्याक्षिक दिले. त्यानंतर उपस्थित स्पर्धकांनी गणेश मुर्ती साकारल्या या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम क्रमांक मृणाल मारुती पारवे, द्वितीय- सिध्दी सतिश चव्हाण , तृतीय- अंकिता प्रमोद क्षिरसागर, उत्तेजनार्थ - माहेश्वरी शेटे, श्रीराम रणदिवे, शांभवी साखरे, विनायक चव्हाण,सई गंगणे यांना सिने अभिनेते शंतनू गंगणे, आयोजक सचिन घोडके, स्पर्धा प्रमुख डॉ. सतिश महामुनी, जिल्हाप्रमुख शेषनाथ वाघ,चित्रकार दिग्विजय कुंभार, गणेश जळके, जेष्ठ कलाशिक्षक भिमाशंकर इंगळे , महामंत्री सुधीर कुलकर्णी यांच्या विजेत्यासह सहभागींनाही प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धेतील श्रीगणेश तयार केलेल्या मूर्तीचे परिक्षण पद्माकर मोकाशे , दत्तात्रय मुसळे, नंदकुमार पोतदार यांनी केले. सदर स्पर्धाकार्यशाळा यशस्वी करण्यासाठी दिपक महामुनी, प्रफुल्लकुमार शेटे,सौ. अपर्णा शेटे, अक्षय भन्साळी, सर्वेश संतोष डोईफोडे सर्व संस्कार भारती, कलाध्यापक बांधव, शिव पार्वती मंगल कार्यालय कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनंजय कुलकर्णी यांनी केले .कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी आभारासह सहभागींने पर्यावरणपूरक मातीपासून आपण तयार केलेल्या गणेशमुर्तीचेच उत्सवात पुजन करावे आवाहन केले.