नळदुर्ग , दि . १५ :
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आज अभियंता दिनानिमीत्त महाविद्यालयातील अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.
15 सप्टेंबर हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिन असून हा दिवस संपुर्ण भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रमात कार्यरत असलेले यांत्रिकी अभियंता प्रा. ॲड. पांडुरंग पोळे, प्रा. परवेझ पिरजादे, विद्युत अभियंता प्रा. युवराज पवार, प्रा. शाहुराज कांबळे यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कोरेकर व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील माजी प्राचार्य डॉ. मोहन बाबरे यांनी सत्कार करून अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रारंभी भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ संजय कोरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर डॉ. संतोष पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार प्रा. मोहन बाबरे यांनी मानले.