नळदुर्ग ,  दि .१५ : 

  समाजातील नाविन्यपूर्ण घडामोडीचे अवलोकन करून  त्यांच्या उत्कर्षासाठी आपणास काही करता येईल का ? यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यादिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त करावे असे विचार प्रा डॉ .वैभव कुलकर्णी सोलापूर यांनी व्यक्त केले .

 नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात  दि १४  रोजी  एक दिवसीय  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .संजय कोरेकर  तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद उपकेंद्राचे संचालक डॉ .डी. के. गायकवाड हे उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय कोरेकर , उपप्राचार्य डॉ रामदास ढोकळे , डॉ मनोज झाडे यांनी केला.  या कार्यक्रमाची सुरूवात उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते रोपट्यांना पाणी घालून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्यांचा परीचय डॉ उध्दव भाले यांनी करून दिला.  यावेळी पुढे बोलताना डॉ विवेक कुलकर्णी यांनी सांगितले की महाविद्यालयातील संशोधन प्राप्त शिक्षकांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी कसा करता येईल यासाठी प्रयत्न करावा.  तसेच महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना समाजातील नाविन्यपूर्ण घडामोडी बाबत आपणास काही करता येईल का यासाठी  जनजागृती करावी व त्यांचा सर्वांगिण विकास कसा करता येईल यासाठी मार्गदर्शन करावे , असे केल्याने  महाविद्यालयाचा दर्जा  सुधारून प्रगती साधता येईल.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ हंसराज जाधव यांनी केले.  या  कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
 
Top