काटी , दि .२७
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सैनिक भिमराव बाबुराव बनसोडे वय (74) यांचे रविवार दि.24 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी काटी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना,दोन मुली,जावई नातवंडे असा परिवार आहे.