नळदुर्ग, दि .२७ :
कर्नाटक व आंध्रच्या एस.टी वाहक-चालकाच्या मनमानी धोरणावर मनसेने संताप व्यक्त करीत नळदुर्ग एस .टी .बसस्थानक येथिल
"वाहतूक नियंत्रकाकड़े निवेदन देऊन संबधितावर कारवाईची केली मागणी.
नळदुर्ग हे एक ऐतिहासिक शहर असून शहरापासुन जवळच असलेले तूळजापुर व अक्कलकोट हे दोन तीर्थक्षेत्र आहेत,नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी व देवदर्शनाला येणाऱ्या पर्यटक व भाविक यांना परतीचा प्रवास करताना रात्रीची वेळ झाल्यास कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्याच्या ये-जा करणा-या एस.टी.बसेसचे वाहक व चालक यांची मनमानी होत असून रात्री अपराञी बस मध्ये प्रवाशांना प्रवेश देत नाहीत,अशा घटना घडत असून वारंवार तक्रारी येत आहेत,काल-परवाच आपल्या महामंडाळाच्या महिला कर्मचारी यांच्या बाबत ही असाच प्रकार घडला आहे,ते आपली सेवा बजावून घरी परतण्यासाठी बस मध्ये चढ़त असताना त्यांना नळदुर्ग येथे गाड़ी न थांबवता उमरगा येथे थांबेल असे बोलून उद्धट वागणूक दिली,व पुढे गाड़ी नळदुर्गला पंधरा मिनिटे थांबली,दिवसा मात्र या परराज्यातील महामंडळाच्या बसेसचे वाहक ओरडुन ओरडुन प्रवाशांना बोलवतात, मात्र रात्रीच्या वेळेस वेगळेच धोरण जर आपल्याच महामंडळ कर्मचा-याबद्दल असे घडत आहे. तर सर्वसामान्य प्रवाशांना किती त्रास होत असेल,तरी याबाबत आपल्या वरिष्ठामार्फ़त संबंधित राज्याच्या एस.टी. महामंडळाकड़े पत्रव्यवहार करावा व अशा मुजोर वृतीच्या वाहक-चालक यांच्यावर कार्यवाही करावी असे नळदुर्ग बसस्थानकचे वाहतूक नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे .
निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांच्या स्वाक्षरी आहेत,यावेळी शहर संघटक रवि राठोड,रोहित नागरसे, दिलीप राठोड यांच्यासह प्रवासी व नागरिक उपस्थित होते.