वागदरी , दि . एस.के.गायकवाड :


रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे उस्मानाबाद जिल्हा महासचिव तानाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथे विविध ठिकाणी आभिष्ठचिंतनाच्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रिपब्लिकन चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते रिपाइंचे उस्मानाबाद जिल्ह्या महासचिव तानाजी कदम (तुळजापूर)यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१६ आक्टोबर रोजी तुळजापूर येथील आंबेडकर चौकात रिपाइंच्या तुळजापूर तालुका व शहर शाखेच्या वतीने आभिष्ठचिंतनाच्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


प्रारंभी महामाव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तानाजी कदय यांचा येथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओहाळ, मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आनंद पांडागळे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रंणजीत गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख प्रमुख विद्यानंद बनसोडे, युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के, विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम,तालुका उपाध्यक्ष विठ्ठल जेटीथोर, तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम,रिपाइंचे जेष्ठ कार्यकर्ते प्रताप कदम,प्रा.अशोक कांबळेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


   तुळजापूर येथील हाडको भिमनगर जयभवानी स्वामील , मोती झरा,पापनासनगर ,वेताळ नगर,आदी ठिकाणी ही विविध पक्ष व संघटनेच्या वतीने तानाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाक्रती पुतळ्यच्या ठिकाणी दि.१४ एप्रिल २०२२ पर्यंत त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा याकरिता संबंधित न.प. कडे पाठपुरावा करावा अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.
 
Top