नळदुर्ग , दि .१७: विलास येडगे
गेल्या अनेक वर्षांपासुन कांही कारणामुळे रखडत पडलेल्या लिंगायत समाजाच्या स्मशान भुमीच्या रस्त्याचा प्रश्न आता मिटला असुन रविवार दि.१७ ऑक्टोबर रोजी नगरपालिकेच्या वतीने या रस्ता बांधणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
नळदुर्ग शहरांतील लिंगायत समाजाच्या स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम कांही कारणास्तव गेल्या अनेक वर्षांपासुन रखडत पडले होते. नगरपालिकेची इच्छा असुनही न्यायालयीन प्रक्रियेमुळे नगरपालिकेला ते काम करता येत नव्हते. या रस्त्यावरून स्मशानभुमीत जातांना नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.मात्र दि.१६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी लिंगायत समाजाचे माजी नगरसेवक संजय बताले यांच्या सहकार्याने रस्ता कामात जो अडथळा होता तो दुर केला. यामध्ये माजी नगरसेवक संजय बताले यांची भुमिका महत्वपुर्ण ठरली. रस्ता कामातील अडथळा दुर झाल्यानंतर दि.१७ ऑक्टोबर रोजी मोठ्या धुमधडाक्यात या रस्ता बांधणीच्या कामाचा नगराध्यक्षा रेखाताई जगदाळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नगरसेवक नितीन कासार, महालिंग स्वामी,माजी नगरसेवक संजय बताले,शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शफीभाई शेख , माजी नगरसेवक दत्तात्रय दासकर, शरद बागल,अमृत पुदाले,शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले,शिवसेनेचे उपतालुकप्रमुख सरदारसिंग ठाकुर, ॲड. अरविंद बेडगे,सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव, माजी नगरसेवक शब्बीर कुरेशी, किशोर नळदुर्गकर, लिंगायत समाजाचे विरय्या निलय्या स्वामी, प्रभुलिंगप्पा थोटे, नागनाथ कलशेट्टी, मल्लिनाथ बाळूरकर, यांच्यासह लिंगायत समाजाचे नागरीक विशेष करून युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडुन तसेच टिकाव मारून या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्ता कामाबरोबरच शास्त्री चौक ते किल्ला गेट व चावडी चौक ते बोरी घाट या रस्त्यांच्या कामांचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलतांना संजय बताले यांनी म्हटले की या रस्त्याचा प्रश्न मागेच मिटला असता मात्र समाजातील कांही मुठभर व्यक्तींनी नाहक हा प्रश्न चिघळविला केवळ अशा मंडळींमुळेच या रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासुन रखडत पडले आहे. त्यामुळे समाजाला याचा त्रास झाला. नगरपालिकेची यामध्ये कुठली आडकाठी नव्हती. या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने व संबंधीताकडे या जागेसंदर्भात कायमस्वरूपी न्यायालयाचा "स्टे" असल्याने आजपर्यंत हे काम होऊ शकले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अशोक जगदाळे व स्वता मी याबाबत एकत्रित बसुन यासंदर्भाचा तोडगा काढला त्यामुळेच आज रस्ता बांधणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आले असल्याचे संजय बताले यांनी म्हटले.
यावेळी बोलतांना अशोक जगदाळे यांनी म्हटले की, लिंगायत समाजाच्या स्मशाभुमीच्या रस्त्याचे काम व्हावे यासाठी मी स्वता अनेकदा प्रयत्न केला.या कामासाठी निधी मंजुर करून या कामाचे टेंडर काढुन ठेकेदाराला हे कामही दिले होते. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे हे काम करता आले नाही हे सर्वांना माहीत असताना लिंगायत समाजातील कांही मंडळींनी हे काम मी करत नाही असे खोटे सांगुन समाजामध्ये गैरसमज पसरविला होता. वास्तविक पाहता स्मशानभुमी सारख्या ठिकाणी कुणीही राजकारण करू नये मात्र कांही मंडळींनी याठिकाणी केवळ राजकारण केले. आज या रस्ता बांधणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. आता यापुढे स्मशानभुमीत स्वच्छतेबरोबरच नागरीकांना बसण्याची व्यवस्था तसेच वीज व पाण्याचीही व्यवस्था करणार असल्याचे अशोक जगदाळे यांनी शेवटी सांगितले. यावेळी कमलाकर चव्हाण, शिवाजीराव मोरे, शफीभाई शेख, ॲड. अरविंद बेडगे यांचीही भाषणे झाली.
या कार्यक्रमास नवल जाधव, रणजित डुकरे,राजेंद्र काशिद, रघुनाथ नागणे, सुनिल गव्हाणे , उमेश जाधव , प्रविण चव्हाण, अमित शेंडगे, सुजित बिराजदार, रघुनाथ नागणे,शाम कनकधर, रहेमान कुरेशी यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसह सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.