काटी , दि . २५ : 

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे रविवार दि.24 रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी हे पती-पत्नी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरकडे जात असताना मराठवाड्याचे प्रवेशद्वार तामलवाडी येथे शाल, फेटा, पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले. अर्धांग वायूतून बरे होऊन ते प्रथमच पती-पत्नी तुळजाभवानी दर्शनासाठी जात होते.
     

 यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आदित्य (भैय्या) गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा उपाध्यक्ष  शिवाजी सावंत , विधानसभा उपाध्यक्ष ओबीसी सेल विठ्ठल माळी, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा मीडिया सेलचे अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, उमेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष महेश गायकवाड, अध्यक्ष मराठवाडा शिवसेवक समिती  निरंजन करंडे,निलेश चिवरे, राष्ट्रवादी काँग्रेस तामलवाडी गण प्रमुख गणेश गुंड, सुरतगाव ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब घोडके, राजेंद्र सुरते,आकाश गुंड, राहुल गुंड आदीसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top