नळदुर्ग , दि .२३ :
प्राथमिक आरोग्य केंद्र व नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील वार्डनिहाय पहिले कोविड लसीकरण इंदिरानगर येथिल जि . प . प्राथमिक शाळेत शनिवार दि .२३ रोजी लसीकरण मोहिमेंचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ९१ लाभार्थीना लस देण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन नगरसेविका भारती सुनिल बनसोडे, नळदुर्ग शहर पञकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे , पञकार विलास येडगे , शिवाजी नाईक, जि. प .शाळेचे मुख्याध्यापक संजय घंटे ,आदीजण उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे यानी लसीकरण दरम्यान काही अडचण व गैरसोय निर्माण झाल्यास सर्वतोपरी मदत करण्याचे बोलताना सांगितले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिचारिका सुमन फुले, शेख एस यु, भुजबळ पी. एस , एम आर भुरे , म्हेञे कुसूम ,पद्मा सांगवे आदीसह नगरपालिकेचे कर्मचारी यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सुञसंचलन, आभार परिचारिका सुमन फुले यानी मानले.
लाभार्थी सुशिलाबाई पटणे याना लसीकरण करुन शुभारंभ करण्यात आला. लाभार्थीना पिण्याचे पाणी व बसण्यासाठी आसन व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे यानी केले.
शहरातील १९ वार्डात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. लाभार्थ्यानी यांचा लाभ घेण्याचे आवाहन करुन भविष्यात लाभार्थी शोधुन , घरोघरी जावुन लसीकरण करण्यात येणार आहे. जेणेकरुन कोविड लसपासुन कुणीही वंचित राहणार नाही. वैद्यकीय आधिकारी डाँ. राहुल जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के उद्दिष्ट आपण पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे नळदुर्ग प्रा. आ. केंदाच्या परिचारिका सुमन फुले यानी सांगितले.