तुळजापूर ,  दि . ३ 


स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त तुळजापूर  शहरात विधीसेवा समिती तुळजापूरच्या वतीने शनिवारी   विधीसेवा जनजागृती फेरी काढण्यात आली. 
          

विधी सेवा समिती तुळजापूर आणि वकील संघाच्या वतीने भारतीय  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.  २ ऑक्टोबर  पासून १४ नोव्हेंबर २०२१ पर्यत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली,  राज्य सेवा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि  जिल्हाविधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांचे निर्धेशानुसार विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.   

           
शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास तुळजापूर  न्यायालयात मध्ये राष्ट्रपिता  महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन दिवाणी न्यायाधीश व्ही.ए. अवघडे, सहदिवाणी न्यायाधीश एम.पी.जसवंत, आर.बी. खंदारे  यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे उदघाटन  करण्यात आले. त्यानंतर जनजागृती फेरीचा प्रारंभ झाला. तुळजापूर शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एसटी स्टॅंड, गोलाई चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे न्यायालयात जनजागृती फेरी आली. 


यावेळी विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश श्री. व्ही.ए. अवघडे, सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती. एम.पी.जसवंत, श्री.आर.बी. खंदारे, वकील संघाचे पदाधिकारी विधिज्ञ श्री डी जि घोडके, विधिज्ञ  बी सी देशमाने,   विधिज्ञ  तानाजी तांबे, विधिज्ञ गिरीश शेटे, , विधिज्ञ तानाजी जगताप, विधिज्ञ  डी ए कदम, विधिज्ञ  नानासाहेब कदम,  पोलीस निरीक्षक तुळजापूर  आदिनाथ काशीद, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  पंडीत, नळदुर्ग ठाणेचे  पोलीस उपनिरीक्षक एम .एम  शहा ,सहाय्यक गटविकासाधिकारी   राऊत, तुळजापूर न्यायालयीन कम॔चारी,  वकील संघाचे सदस्य आदी  उपस्थित होते.  जनजागृती फेरीद्वारे जनसामान्यमध्ये विधी सेवा समिती, मोफत विधी सेवा सहाय्य, लोकअदालत आणि लोकअदालतचे फायदे याबाबत जनजागृती करण्यात आली. 
न्यायालयात जनजागृती फेरीचा समारोप झाला.
 
Top