तुळजापूर , दि . ३ : 

तालुक्यातील अणदूर येथील हॅलो मेडिकल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने किलज येथील कोरोना पश्चात गरजू रुग्णांना तसेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या गरजू कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.


यामध्ये कोरोना पश्चात एकूण ६ गरजू रुग्णांना प्रत्येकी ५ हजार रु तर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या एकूण ८ गरजू कुटुंबियांना प्रत्येकी १० हजार रु आर्थिक मदत देण्यात आली. त्याचबरोबर किलज गावातील शिक्षणापासून वंचित असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना एल ई डी टीव्ही संच देण्यात आला.या माध्यमातून किलज मधील गरजू विद्यार्थी हे डिजिटल पध्दतीने शिक्षण घेणार आहेत.ही मदत हॅलोचे अध्यक्ष डॉ शशिकांत अहंकारी ,  प्रकल्प समन्वयक बसवराज नरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वाटप करण्यात आली. 

त्याचबरोबर किलज ग्रामपंचायतच्या कोव्हीड समितिने कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्रामपंचायत किलज ला १० हजार रु जागरूक ग्रामपंचायत कोव्हीड समिती म्हणून करण्यात आली.जवळपास हॅलोच्या माध्यमातून किलज गावाला २ लाख रु आर्थिक साहाय्य लाभले आहे.किलज येथील ग्रामपंचायत  कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात या मदतीचे वितरण करण्यात आले.हॅलोच्या या मदतीचे किलज ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानले.



यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील ,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण,सिद्धाराम खराडे,साधू मुळे,अशोक पाटील,जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडगर,माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, किलज गावच्या सरपंच अर्चना शिंदे,उपसरपंच दिक्षा गवळी,विविध सहकारी सोसायटी चेअरमन पंडित जळकोटे,पंचायत समिती सदस्य खंडूराज शिंदे,किलज गावच्या पोलीस पाटील सुनीता मर्डे,मल्लिकार्जुन येलुरे,धनराज शिंदे,शिवराज मर्डे, ग्रामविकास अधिकारी सचिन चौधरी दादा चौधरी,उत्तम पाटील,संजय भोईटे, अशोक कंदले,आप्पासाहेब पाटील,अमोल जेठीथोर, यांच्यासह किलज ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि कर्मचारी  ग्रामस्थ उपस्थित  होते.
 
Top