उमरगा , दि .३
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय आयक्यूएसी आणि वाणिज्य विभागाच्यावतीने बीकॉम या पदवी समकक्ष असलेल्या बी व्हाक इन टॅक्सेशन अंड जीएसटी अकाउंटिंग याअभ्यासक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन टॅक्स कन्सल्टंट एडवोकेट विश्वराज बरबडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
टॅक्सेशन अंड जीएसटी अकाउंटिंग या स्पेशल विषयात पदवी अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जीएसटी आणि टॅक्सेशनचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक मिळावे या कार्यशाळाचे आयोजन केले. या कार्यशाळेत जीएसटी मूळ संकल्पना आणि त्यामध्ये होणारे बदल या विषयावर एडवोकेट बरबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना वाणिज्य या विषयात करिअर करण्यासाठी टॅक्सेशन आणि अकाउंटिंग याची संपूर्ण आणि प्रत्यक्ष सरावाचे ज्ञान घ्यावे असे आवाहन केले.
या कार्यशाळेत संगमेश मंठाळकर विक्रम पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन जीएसटी कसा भरावा जीएसटी रिटर्न कसे भरावे याचे प्रात्यक्षिक दिले. अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ संजय अस्वले यांनी वाणिज्य विभागात पारंपारिक बी कॉम पदवी पेक्षा बी व्हाक इन टॅक्सेशन अंड जीएसटी अकाउंटिंग या पदवी अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा कारण येत्या काही वर्षात विद्यापीठ अनुदान आयोग अशा व्यावहारिक पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात करत आहे. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. अजित आष्टे यांनी तर आभार खंडू मुरळीकर यांनी केले. यावेळी प्रा. हिरेमठ यांसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.