जळकोट,दि.१६ : मेघराज किलजे

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,संभाजी नगर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, सेवानिवृत्त शिक्षक   भालचंद्र पोतदार गुरुजी  यांनी थोर महापुरुषाचे पुस्तके भेट दिली.


 विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित व्हावी. वाचनातून सत्य, अहिंसा, शांती,प्रेम व सदाचार या  नैतिक मूल्यांची जोपासना व्हावी. ह्या उद्देशाने शालेय ग्रंथालयास म.गांधी-सक्षिप्त चरित्र, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले, अभ्यास कसा करावा ?, क्रांतीवीर उमाजी नाईक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील,राष्ट्रसंत तुकडोजी, रणरागिनी झाशीची राणी, चंद्रशेखर आझाद, साहित्यातील तेजस्वी तारा अण्णाभाऊ साठे, मराठे  व किल्ले जंजिरा इत्यादी पुस्तके भेट दिली. 

यावेळी पोतदार गुरूजी यांनी त्यांच्या वाचनातील प्रेरणादायी विचारांचे केलेल्या कात्रणांचा संग्रहातील लेख विद्यार्थी व शिक्षकांना वाचण्यास दिले. विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.डी.  रेणूके  हे उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री . जी.एस.  अभिवंत , श्री.एन.एन. इटकरी , श्रीमती एम.एस. रेणूके ,श्री. डी. एस.  वनवे   यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.डी. एन.   यांनी तर आभार सातवी मधील विद्यार्थिनी कु. अंजली मिलिंद डावरे या विद्यार्थिनीने मानले.

 
Top