मुरुम, दि. १६ :
मुरुम येथील जिल्हा परिषद प्रशालेत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन शुक्रवारी रोजी वाचन प्रेरणा दिवस म्हणून व जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रशालेतील विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदोन्नती झालेले प्रशालेचे सहकारी शिक्षक कल्लाप्पा पाटील यांचा मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर मंमाळे, विजयकुमार देशमाने, राजू पवार, बालाजी परीट सह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रशालेतील माध्यमिक शिक्षक विजयकुमार देशमाने यांचा वाढदिवस प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या हस्ते सत्कार करून साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त विजयकुमार देशमाने यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी मुख्याध्यापक मंमाळे व देशमाने यांनी माहिती सांगितली. या कार्यक्रमास बहुसंख्ये विद्यार्थी उपस्थित होते.