नळदुर्ग , दि . ९ :
नळदुर्ग येथील भारतीय स्टेट बँक तर्फे बँकेच्या कार्यक्षेत्रातील गावातील नागरीकांना बँकेच्या विविध योजना, विविध कर्ज प्रकरण, विमा योजना याबाबत माहिती व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी , या हेतुने कर्ज मेळावा घेण्यात आला. यावेळी परिसरातील ५ बचत गटांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले.
नळदुर्ग येथील एसबीआय शाखेत शुक्रवार दि . ८ आॕक्टोंबर रोजी एसबीआय बँक लोन मेळावा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी एस बी आय शाखेचे वरीष्ठ व्यवस्थापक शामराव वाघमारे, नगरपरीषदेचे अजय काकडे, खलील शेख, नळदुर्ग बँकेचे शाखाधिकारी निर्माण पारकर, सुखविंदर सिंग, निळू राठोड, दिलासाचे समन्वयक विलास राठोड, गुरुदेव राठोड, भुषण पवार, श्रीमंत राठोड, बचत गटाच्या कल्पना गायकवाड, पत्रकार विलास येडगे ,तानाजी जाधव, दादासाहेब बनसोडे, शिवाजी नाईक. परीसरातील बचत गटाच्या महिला व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार विलास राठोड यांनी मानले.