अणदुर , दि .१९ :
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील राज्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या धर्मपत्नी शालिनी (काकु) मधुकरराव चव्हाण यांना शोकाकुल वातावरणात शाश्रुनयनानी अखेरचा निरोप देण्यात आला.
सोमवारी शालिनी काकुचे वयाच्या 82 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कौटुंबिक जबाबदारी शालीनी काकु यांनी अतिशय चोखपणे सांभाळत चव्हाण यांच्या राजकीय जीवनात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या होत्या.
राजकारणात सक्रिय असताना मुलांचे शिक्षण कौटुंबिक जबाबदारी अतिशय चोखपणे त्यांनी पार पाडली. त्या खूप मृदू स्वभावाच्या होत्या गोरगरिबांना त्यांचा कायम मदतीचा हात असायचा,
त्यांच्या अणदुर येथील शेतामध्ये त्याना अखेरचा निरोप देण्यात आला .यावेळी माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांचे सुपूञ जि .प. सदस्य बाबुराव मधुकरराव चव्हाण , काँग्रेस प्रदेश सचिव सुनिल मधुकरराव चव्हाण व नातेवाईकासह , शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी अणदुर, राजशेखर शिवाचार्य स्वामीजी नंदगाव ,गंगाधर स्वामीजी जेवळी बसवराज पाटील ,बापुराव पाटील,धीरज पाटील,विश्वनाथ चाकोते, सिध्दाराम म्हेत्रे,सचिन कल्याणशेट्टी, विश्वासराव शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी खासदार रविद्र गायकवाड,आप्पासाहेब पाटील,सुरेश बिराजदार,उल्हास बोरगावकर, अँड लक्ष्मीकांत पाटील,बाळासाहेब हाडोळीकर, भिमाशंकर जमादार,भिमाशंकर हासुरे,अशोकराव जवळगे,ज्ञानेश्वर पाटील,प्रशांत चेडे,अँड नितीन काळे,शिवदास कांबळे ,अस्मिता कांबळे,दत्ताभाऊ शिंदे,संजय पाटील दुधगावकर,अनिल खोचरे,सुरेश धस,बंदामराव पंडीत, ब्रिजलाल मोदाणी,धर्मराज काडादी ,नागनाथ कानडे,सिद्रामप्पा खराडे,संभाजी पाटील बाभळगावकर,मकरंदराजे निंबाळकर, दत्ताभाऊ कुलकर्णी, धनंजय रणदिवे, प्रकाश चव्हाण, हारिश जाधव, परंड्याचे माजी नगराध्यक्ष सुभाषसिंग सिध्दीवाल, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकुर , शहरप्रमुख संतोष पुदाले, माजी नगरसेवक संजय बताले, सुधीर हजारे, इमाम शेख , सचिन डुकरे , अमृत पुदाले, शिवाजीराव मोरे , नगरसेवक विनायक अहंकारी , बसवराज धरणे , शहबाज काझी, नितीन कासार , नळदुर्ग काँग्रेस शहराध्यक्ष नवाज काझी , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव यासह विविध गावचे सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक,सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आदीसह चव्हाण परीवार अणदुर परीसरातील तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने हभागी झाले होते.