तुळजापुर , दि .१९ : 

निराधार व्यक्तींना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा आधार आहे,. परंतु हे अनुदान मागील तीन महिन्यांपासून रखडल्याने निराधारांना  आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे, त्यामुळे शासनाने त्यांचे अनुदान तात्काळ जमा करण्याची मागणी  लाभार्थ्यांकडून  केली जात आहे .


तुळजापूर तालुक्यातील  ग्रामीण भागातील लाभार्थी शहरामध्ये बँकेमध्ये अनुदानाची विचारणा  सतत करत आहेत. परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. कोरोनाच्या संकटामुळे शासनाने अनेक योजनांच्या निधीला कात्री लावली आहे. शासन स्तरावरून श्रावणबाळ संजय गांधी निराधार इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वृद्धापकाळ योजना, अशा सहा प्रकारच्या योजनांचे गेल्या काही महिन्यापासून अनुदान थांबले आहे, त्यामुळे निराधारांना दैनंदिन गरजा सोबत दवाखान्याचा खर्चही भागविणे कठीण झाले असून  चुल कशी पेटणार  असा प्रश्न निर्माण झाला आहे. तुळजापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना जुलै ,ऑगस्ट ,सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे अद्याप मिळाले  नसल्याची तक्. याच बरोबर ज्यांना सांभाळणारे कोणी नाही अशा लाभार्थ्यांची तर मोठी कुचंबणा होत आहे. 
 
Top