नळदुर्ग , दि .१९ :
नळदुर्ग नगरपालिकेचे नगरसेवक तथा स्वच्छता व आरोग्य सभापती दयानंद ऊर्फ बापू आप्पाराव बनसोडे वय ५५ वर्ष यांचे मंगळवार दि. १९ आँक्टोंबर रोजी सोलापूर येथे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते माजी नगरसेवक किशोर बनसोडे नळदुर्गकर यांचे चुलते होत.
फुले शाहू आंबेडकर चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते सभापती दयानंद बनसोडे याना ञास होत असल्याने मंगळवारी पहाटे उपचारासाठी
सोलापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. माञ उपचारादरम्यान त्याचा हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे दादासाहेब बनसोडे यानी सांगितले .
बनसोडे हे भिमनगर - बुध्दनगर येथुन तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडुन आले होते. दरम्यान सोमवारी नगरपालिकेत सर्वसाधरण सभेला उपस्थित राहुन पालिकेसमोर सुरु असलेल्या सुनिल बनसोडे यांच्उया पोषणास भेट देवुन आपला पाठिबा दिला. ते अखेरचे ठरल्याची नागरिकात चर्चा होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी ३ मुले, एक विवाहीत मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर बुधवार
दि २०/ १० / २०२१ रोजी सकाळी १० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.