नळदुर्ग  दि .१८ 

 प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा, नळदुर्ग शहरातील अतिक्रमण धारकांना या दोन्ही योजनांचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी सुनील बनसोडे यांनी सोमवार  दि.१८ रोजी नगरपालिका कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार यानी लेखी पञ देवुन उपोषणकर्तेना दिल्याने  हा उपोषण मागे घेतले.


  सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे ही केंद्र सरकारची योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या लोकांना रहाण्यासाठी पुरेशी जागा आहे पण त्यांना पक्के घर नाही अशाना या योजनेचा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या बाबतीत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या वतीने वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ज्यात अतिक्रमण असणाऱ्या नागरिकांचा ही यात समावेश करून त्यांना या योजनेचा लाभ देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आलेले आहेत. 
नळदुर्ग  पालिकेच्या वतीने जवळपास ७०० लाभार्थ्याची निवड करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात मात्र २०० लाभार्थ्यानाच याचा लाभ मिळाला. याचे कारण उर्वरित लोकांचे अतिक्रमण असल्याचे सांगितले जात आहे. माञ पालिकेने या अतिक्रमण धारकांचे सर्वे कशासाठी केले असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.

या उपोषणास नगरसेवक उदय जगदाळे, दयानंद बनसोडे, निरंजन राठोड,  नगरसेविका छमाबाई राठोड, प्रकाश गायकवाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व तरूण मंडाळाच्या सदस्यानी पाठिंबा दिला.
 
Top