नळदुर्ग  , दि . १९ : 


 माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण  यांच्या  पत्नी शालिनी मधुकरराव चव्हाण वय  82 वर्ष, यांचे  पुणे येथे सोमवारी  एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या  पार्थिवावर  अणदुर ता. तुळजापूर येथिल शेतात मंगळवारी  दुपारी  २ वाजता वाजता  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण  यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी  कौटुंबिक जबाबदारी त्यानी अतिशय चोखपणे सांभाळत  चव्हाण  यांच्या राजकीय जीवनात त्यांच्या पाठीमागे यशस्वी व खंबीरपणे  उभ्या होत्या. मधुकरराव चव्हाण हे राजकारणात सक्रिय असताना मुलांचे शिक्षण, कौटुंबिक जबाबदारी अतिशय चोखपणे त्यांनी पार पाडली. त्यांच्या पश्चात पती मधुकरराव चव्हाण , काँग्रेसचे प्रदेश सचिव  सुनिल चव्हाण ,  जि.प. सदस्य  बाबुराव चव्हाण हे दोन  मुले, दोन मुली, दोन सुना, नातू, पणतु  आदी परिवार आहे.


निधनाचे वृत्त समजताच अणदुरसह परिसरात शोककळा पसरली. 

 
Top