मुरूम,   दि. २३  

 श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील इनडोअर स्टेडियम मध्ये बापूराव माधवराव पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त शनिवारी  दि. २३ रोजी आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी नगध्यराक्षा अनिता  अंबर, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य चंद्रकांत बिराजदार, माजी नगराध्यक्ष बबन बनसोडे, नगरसेवक श्रीकांत बेंडकाळे, पंचायत समिती माजी उपसभापती गोविंद पाटील, नगरसेवक महेश माशाळकर, श्रीमंत भुरे उपस्थित होते. बापूराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मुरूम शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. या स्पर्धेत विविध गटातील ६८ संघाने सहभाग घेतला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १४ वर्षे वयोगट एकेरी १६ संघ, दुहेरी ०८ संघ, १९ वर्षे वयोगट एकेरी १६  संघ, दुहेरी ०८ संघ तर खुला गट एकेरी ०८ संघ दुहेरी १२ संघाने सहभाग घेतला असून मुलींचे चार संघ सहभागी आहेत. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते फित कापून व  कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उद्घाटनाचा सामना पालक कोठारी व न्याया हावळे विरुद्ध मयुरी जाधव व भक्ती चौधरी यांच्यात रंगला तर मुलांच्या गटात संग्राम इंगोले विरुद्ध शुभम शेवाळकर व सक्षम शेळके विरुद्ध समर्थ कोकणे यांच्यात रंगला. या सामन्याचे पंच म्हणून डॉ. भिलसिंग  जाधव, प्रा. नारायण सोलंकर, धनराज पवार, सुजित शेळके, अनिकेत इंगोले, निखिल हंगरगे, ओमकार महामुनी, नागेश हंगरगे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. यावेळी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण व सर्व पदाधिकारी, शरण पाटील मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच उपप्राचार्य सुधीर अंबर, प्रा. डॉ. रवी आळंगे, प्रा. डॉ. राजू शेख, प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले, प्रा. अशोक बावगे, प्रा. सुजित मठकरी, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. डॉ. राम बजगिरे, हुकुम कौलकर, झुंबर गायकवाड, प्रशांत मुरूमकर, नाना बेंडकाळे, संकेत इंगोले, राहुल वाघ, विकास शिंदे, राम डोंगरे, सुधीर गायकवाड, रूपचंद कारडामे, दीपक कौलकर, रवी माने, दिलीप स्वामी महाविद्यालयातील प्राध्यापक,  शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गायकवाड तर आभार राजू मुल्ला यांनी मानले.      

 
Top