नळदुर्ग , दि . ८
काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनिल चव्हाण यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के .सी .वेणुगोपाल राॕय यानी पञ दिले आहे. या निवडी बद्दल काँग्रेसच्या पदाधिका-यानी , कार्यकर्त्यांनी अभिनंदन करुन सुनिल चव्हाण याना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
माजी मुख्यमंञी पृथ्वीराज चव्हाण , आशोक चव्हाण, राज्यगृहमंञी सतेज पाटील , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो, कार्याध्यक्ष बसवराज पाटील , वैद्यकीय शिक्षणमंञी आमित देशमुख , ना. विश्वजीत कदम आदीनी युवकाना संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले असुन सुनिल चव्हाण यांचे निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.