नळदुर्ग , दि . ८ : विलास येडगे
नळदुर्ग शहर व परीसरात दि.७ ऑक्टोबर रोजी नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात झाले. शहरातील अंबाबाई मंदिरात घटस्थापना झाल्यानंतर नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली.
यावेळी शहरातील हिंदु धर्मातील नागरीकांच्या घरात घटस्थापना करण्यात आली आहे. शहरात पाच ठिकाणी सार्वजनिक देवी मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दि.७ऑक्टोबर रोजी संपुर्ण देशात मोठ्या उत्साहात नवरात्र महोत्सवास सुरवात झाली आहे. राज्यातही नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. यावेळी कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे राज्यसरकारने नवरात्राच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्व मंदिरे भक्तांसाठी खुली केली आहेत त्यामुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे नवरात्रातही मंदिरे बंदच होती. दि.७ ऑक्टोबर रोजी घटस्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली. नळदुर्ग शहरातही मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात नवरात्र महोत्सवास प्रारंभ झाला आहे. येथील बोरीनदीच्या काठावर वसलेल्या प्राचिन अंबाबाई मंदिरात सकाळी घटस्थापना झाल्यानंतर नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली. या मंदिरात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रामध्ये भाविक विशेष करून महिला भाविक मोठ्यासंख्येने दररोज येतात. नवरात्रामुळे मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
शहरातही प्रत्येक हिंदु धर्मियांच्या घरात घटस्थापना होऊन नवरात्र महोत्सवात सुरुवात झाली आहे. शहरातील शिवशाही तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, सुंदरदेवी नवरात्र महोत्सव तरुण मंडळ, जय हिंद तरुण मंडळ, इंदिरानगर येथे सार्वजनिक ठिकाणी श्री देवींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नळदुर्ग शहरासह परीसरातील गावांमध्येही नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे.
नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तर नगरपालिकेने अंबाबाई मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच मंदिर परीसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच याठिकाणी जंतुनाशक औषधांची फवारणीही केली आहे. आता नवरात्रातील नऊ दिवस वातावरण अतीशय भक्तीमय राहणार आहे.