चिवरी ,  दि . ७ : 


 तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात मागील चार दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाचा तसेच गारांचा पाऊस होत आहे, यामुळे खरीपातील विविध पिके पाण्याखाली गेले असुन शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

या पावसामुळे काढणीला आलेले मुख्यता  सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे, याच बरोबर ऊस ,द्राक्षे बागा यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे, मागील आठवड्यामध्ये परिसरामध्ये अतिवृष्टीच्या पावसामध्ये अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र महसूल प्रशासनाने  तालुक्यातील सात पैकी पाच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली नसल्याचा अहवालात नमूद केले आहे केवळ दोन महसूल मंडळाचा समावेश  केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदतीसह पिक विमा मिळणार का नाही या संभ्रमात शेतकरी सध्या दिसत आहे, 

एकंदरीत मागील आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा   नळदृर्ग मंडळातील शेतकऱ्यांनाही बसला आहे त्यामुळे महसूल प्रशासन  सादर केलेल्या अहवालाबददल या परिसरातील शेतकर्‍यातुन तीव्र  नाराजी व्यक्त होत आहे.
 
Top