नळदुर्ग , दि . ११
नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीत रुग्णालय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलने करण्यात आली .यामध्ये घंटा नाद,पोस्टर वॉर, प्रतीकात्मक उद्घाटन, दि . १५ ऑगस्ट स्वांतत्र्यदिनी आक्रमक पवित्रा घेत उपोषण केले होते,त्यावेळी वैद्यकिय अधीक्षक डॉ. मुल्ला यांनी मनसेच्या पदाधिका-यांना १५ दिवसात रुग्णालय सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले होते,परंतु लेखी आश्वासन घेत असताना, जर १५ दिवसात रुग्णालय सुरु न झाल्यास या इमारतीमध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संपर्क कार्यालय सुरु करू. असा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला होता,लेखी आश्वासन देऊन दोन महीने होत आहेत,परंतु अद्याप पर्यन्त हे रुग्णालय सुरु झाले नाही .
प्रशासनाने गेंड्याची कातडी पांघरली आहे असा आरोप करीत, सोमवार दि ११ ऑक्टोंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारती मध्ये ,जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते, जिल्हासचिव जोतिबा येडगे, शहराध्यक्ष अलिम शेख, शहरसचिव प्रमोद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन करून संपर्क कार्यालय थाटण्यात आले .
यावेळी शहरसंघटक रवि राठोड, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव आवेज इनामदार, संदीप वैद्य यांचेसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
किमान आता तरी प्रशासनाने जनाची नाही तर मनाची लाज बाळूगुन हे रुग्णालय तात्काळ सुरु करावे, असे जिल्हाध्यक्ष श्री.नवगिरे यांनी प्रशासनाला खड़े बोल सुनावले .